मुंबई : अल्पवयीन मुलाचा विनयभंग केल्याप्रकरणी एका ४५ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे या महिलेच्या मोबाईलमधून पोलिसांना या मुलाचे आक्षेपार्ह फोटोही सापडले आहेत. १२ वर्षीय हा मुलगा सहावीत शिकत असून त्याचे आई-वडील वेगळे रहातात. १२ वर्षाय हा मोठा मुलगा त्याच्या वडीलांसोबत रहातो तर इतर दोन जुळी भावंडही आईसोबत रहातात. कधी कधी मुलगा त्याच्या भावंडांना भेटायला आईचा घरी जात असतो. तिथेच आईच्या मैत्रिणीने मुलाचा विनयभंग केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. 


याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली असून सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे. तिने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता मात्र तो देखील कोर्टाने फेटाळून लावला आहे.