मुंबई : तब्बल १७ वर्षानंतर भारताला मिस वर्ल्डचा किताब मिळवून देणारी ब्युटी विथ ब्रेन मानुषी छिल्लरचं मध्यरात्री भारतात आगमन झालं.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


मानुषीचं जोरदार स्वागत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतल्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशवासीयांनी मानुषीचं जोरदार स्वागत केलं.


मानुषीच्या स्वागतासाठी चाहत्यांची विमानतळावर गर्दी


चीनमध्ये पार पडलेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेऊन मिस वर्ल्डचा किताब पटकावल्यानंतर मानुषी सिंगापूरला गेली होती. नियोजित कार्यक्रमानुसार ती रात्री भारतात येणार होती. त्यामुळे मानुषीच्या स्वागतासाठी तिच्या हजारो चाहत्यांनी विमानतळावर रात्री १२ वाजल्यापासून ठाण मांडलं होतं.


विमानतळावर एकच जल्लोष


हातात तिरंगा घेऊन आलेल्या तिच्या चाहत्यांनी मानुषीचं विमानतळावर आगमन होताच एकच जल्लोष केला.



मानुषीनेही हात उंचावत हसतमुखाने सर्वांच्या अभिवादनाचा स्विकार करत सर्वांना धन्यवाद दिले.