मुंबई : विरोधक सत्ताधा-यांना सातत्यानं चिडवण्याचा प्रयत्न करतायेत. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सभागृहात जात असतानाही त्याचा प्रत्यय आला.  पाय-यांवर बसलेले भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे येताच म्याव-म्याव अशा घोषणा दिल्या. या घोषणांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे विधानसभेत जात असताना विरोधक पायऱ्यांवर बसले होते. सुरूवातीला विरोधक घोषणा देत होती. मात्र आदित्य ठाकरे आल्यावर आमदार नितेश राणे यांनी 'म्याव... म्याव....म्याव... ' करत चिडवलं. यानंतर तेथील उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 



आदित्य ठाकरेंना धमकी, विधानसभेत पडसाद 


 महाविकास आघाडी सरकारमधील पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी एकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आदित्य यांना मिळालेल्या धमकीचे  पडसाद विधानसभेत उमटलेत. सत्ताधारी आणि विरोधकांनी धमकीचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. या धकमीप्रकरणी एसआयटीमार्फत तपास करण्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली आहे. 


पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली होती. या धमकी प्रकरणी विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले. ही एका मंत्र्याला धमकी नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला धमकी आहे, असे विरोधकांनी म्हटले आहे. एकाद्या मंत्र्याला किंवा विधानसभा सदस्याला धमकी देणाऱ्याला जबर बसली पाहिजे. याची गंभीर चौकशीची मागणी सत्ताधारी आणि विरोधकांनी हिवाळी अधिवेशनात केली.