मुंबईतून ठाणे प्रवास जलद होणार; मेट्रो 4 प्रकल्पाबाबत आली मोठी अपडेट, स्थानकांची नावे एकदा पाहाच!
Mumbai Metro Update: वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4 कासारवडवली ते गायमुख मेट्रो 4अ आणि स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो 6 या मार्गिकांसाठी निविदा काढल्या आहेत.
Mumbai Metro: मुंबईकरांचा प्रवास वेगवान करण्यासाठी मेट्रोचं जाळं उभारण्यात येत आहे. मात्र, असं असतानाही MMRDAला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळं मेट्रोचे प्रकल्प सुरू होण्यास विलंब होत आहे. वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४, कासारवडवली ते गायमुख मेट्रो ४अ आणि स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो ६ या मार्गिकांसाठी ५७ गाड्यांच्या खरेदीसाठी काढलेल्या निविदा अखेर १० महिन्यांनी खुल्या केल्या आहेत. त्यामध्ये रस्ते आणि पायाभूत क्षेत्रातील लार्सन अँड टुब्रो लि., एनसीसी लि. या कंपन्यांनीही आता मेट्रो डब्बे निर्मितीच्या क्षेत्रात उतरण्यासाठी निविदा भरल्या आहेत
एमएमआरडीएने मेट्रो सहा मार्गिकेसाठी जानेवारीमध्ये निविदा मागविल्या होत्या. या १५.३१ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकेसाठी २,०६४ कोटी रुपयांच्या निविदा काढली होती. यातून मेट्रो ६ मार्गिकेसाठी १८ गाड्या खरेदी केल्या जाणार होत्या. या निविदांना तब्बल ११ वेळा मुदतवाढ दिल्यानंतर लार्सन अँड टुब्रो कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत.
मार्गिका कधी सुरू होणार?
एमएमआरडीएने यापूर्वी मेट्रो ४ मार्गिकेसाठी ३९ मेट्रो गाड्यांच्या खरेदीसाठी मार्च २०२१ मध्ये बाँम्बार्डियर ट्रान्सपोर्टेशन कंपनीला १,८५४ कोटी रुपयांना कंत्राट दिले होते. मात्र, त्यावेळी मेट्रो मार्गिकेच्या कारशेडच्या जागेचा तिढा कायम असल्याने ही मार्गिका कधी सुरू होणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यातून गाडीचे डब्बे पुरविण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने बॉम्बार्डियर कंपनीने हा करार एकतर्फी संपवीत असल्याचे जानेवारी २०२२ मध्ये एमएमआरडीएला कळविले होते.
कंत्राटदाराला मेट्रो गाड्या, कम्युनिकेशन बेस्ड सिग्नलिंग सिस्टम, ट्रेन कंट्रोल, प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर, डेपो मशिनरी अँड प्लँट, आदी गोष्टी पुरवाव्या लागणार आहेत. लि., एनसीसी लि. आणि सीआरआरसी नांजिंग पुझेन कंपन्यांनी निविदा भरली आहे, तर एमएमआरडीएने मेट्रो ४ या ३२.३२ किमी लांबीच्या आणि मेट्रो ४अ या २.७ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकेसाठी मेट्रो गाड्या खरेदीसाठी फेब्रुवारीमध्ये निविदा काढल्या होत्या. यामध्ये एकूण ३९ गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. त्यासाठी एमएमआरडीएने ४ हजार २९७ कोटी रुपयांच्या निविदा मागविल्या होत्या.
कसा आहे मेट्रो मार्ग-4
मुंबई मेट्रो मार्ग-४ (वडाळा - कासारवडावली)
वडाळा ते कासारवडवली मेट्रो मार्ग 4 हा 32.32 किमी लांबीचा उन्नत मार्ग आहे. सदर मार्गामध्ये एकूण 30 स्थानके असतील. सदर मार्ग सध्याच्या ईस्टर्न एक्स्प्रेस रोडवे, मध्य रेल्वे, मोनोरेल, सध्या सुरू असलेला मेट्रो मार्ग 2ब (डी एन नगर ते मंडाळे), मेट्रो मार्ग 5 (ठाणे ते कल्याण), मेट्रो मार्ग 6 (स्वामी समर्थनगर ते विक्रोळी) यांच्यात परस्पर जोडणी प्रदान करेल. सदर मार्ग मुंबईतील व्यावसायिक आणि महत्त्वाच्या भौगोलिक ठिकाणांवर रेल आधारित प्रवेश प्रदान करेल.
मेट्रो 4 मार्गावरील स्थानके
1. भक्तीपार्क मेट्रो, 2. वडाळाटीटी, 3. अनिकनगरबसडेपो, 4. सिद्धार्थकॉलनी, 5. गरोडियानगर, 6. पंतनगर, 7. लक्ष्मीनगर, 8. श्रेयससिनेमा, 9. गोदरेजकंपनी, 10. विक्रोळीमेट्रो, 11. सूर्यानगर, 12. गांधीनगर, 13. नेव्हलहाऊसिंग, 14. भांडुपमहापालिका, 15. भांडुपमेट्रो, 16. शांग्रीला, 17. सोनापूर, 18. फायरस्टेशन, 19. मुलुंडनाका, 20. ठाणे तीनहात नाका, 21. आरटीओ ठाणे, 22. महापालिकामार्ग, 23. कॅडबरी जंक्शन, 24. माजिवडा, 25. कापूरबावडी, 26. मानपाडा, 27. टिकूजी-नि-वाडी, 28. डोंगरीपाडा, 29. विजयगार्डन, 30. कासारवडवली