मुंबई मेट्रोत १ हजार नोकऱ्या, सातव्या वेतन आयोगानुसार पगार
महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि महाराष्ट्र सरकारच्या पीएसयूने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई मेट्रोसाठी १ हजार जणांची भरती केली जाणार आहे. यात वेगवेगळी पदं
मुंबई : महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि महाराष्ट्र सरकारच्या पीएसयूने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई मेट्रोसाठी १ हजार जणांची भरती केली जाणार आहे. यात वेगवेगळी पदं आहेत, अनुभवी आणि अनुभव नसणाऱ्या एकूण १ हजार लोकांची गरज मुंबई मेट्रोला आहे. महाराष्ट्रातील तरूणांसाठी ही सुवर्ण संधी आहे.
मुंबई मेट्रोसाठी एमएमआरडीएकडे अर्ज करावा लागणार आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. १६ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर पर्यंत ही प्रक्रीया चालणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना एमएमआरडीएकडून सातव्या वेतन आयोगानुसार, पदाप्रमाणे पगार दिला जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता ही प्रत्येक पदानुसार वेगळी असणार आहे, त्यामुळे ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल, त्यांनी कृपया अर्ज करण्याआधी एमएमआरडीएची मुंबई मेट्रोसाठी भरती करण्याची जाहिरात आणि त्यातील अटी नीट वाचून खात्री करावी.
एकूण १ हजार ५३ जणांना वेगवेगळ्या माध्यमातून नोकऱ्या मिळणार आहेत, तरी उमेदवारांनी एमएमआरडीएची ऑफिशियल वेबसाईट mmrda.maharashtra.gov.in वर आपले अर्ज ठरलेल्या मुदतीत ऑनलाईन सादर करावेत.
नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी MMRDA official website - www.mmrda.maharashtra.gov.in
रिक्त जागांचा तपशील
स्टेशन व्यवस्थापक: 18 रिक्त जागा
स्टेशन नियंत्रक: 120 रिक्त जागा
विभाग अभियंता: 166 रिक्त जागा
कनिष्ठ अभियंता: 30० रिक्त जागा
ट्रेन ऑपरेटर (शटिंग): 12 रिक्त जागा
मुख्य रहदारी नियंत्रक: 06 रिक्त जागा
रहदारी नियंत्रक: 08 रिक्त पदे
कनिष्ठ अभियंता (एस & टी): ०: रिक्त जागा
सुरक्षा पर्यवेक्षक- I: ०१ पोस्ट
सुरक्षा पर्यवेक्षक -२: ० V रिक्त पदे
वरिष्ठ विभाग अभियंता: V० रिक्त जागा
तंत्रज्ञ -1: 75 रिक्त जागा
तंत्रज्ञ -२: 277 रिक्त पदे
वरिष्ठ विभाग अभियंता (नागरी): 07 रिक्त जागा
विभाग अभियंता (नागरी): 16 रिक्त जागा
तंत्रज्ञ (नागरी) -आय: ० V रिक्त जागा
तंत्रज्ञ (नागरी) -II: 26 रिक्त जागा
वरिष्ठ विभाग अभियंता (ई & एम): ० V रिक्त जागा
विभाग अभियंता (ई & एम): 06 रिक्त जागा
तंत्रज्ञ (ई & एम) -आय: 05 रिक्त जागा
तंत्रज्ञ (ई & एम) -II: 11 रिक्त जागा
मदतनीस: 13 रिक्त जागा
वरिष्ठ विभाग अभियंता (एस & टी): १ V रिक्त जागा
विभाग अभियंता (एस & टी): 36 रिक्त जागा
तंत्रज्ञ (एस & टी) -आय: रिक्त जागा
तंत्रज्ञ (एस & टी) -II: 97 रिक्त जागा
सुरक्षा पर्यवेक्षक: ० V रिक्त जागा
वित्त सहाय्यक: 02 रिक्त जागा
पर्यवेक्षक (ग्राहक संबंध): 08 रिक्त जागा
व्यावसायिक सहाय्यक: 04 रिक्त जागा
स्टोअर सुपरवायझर: 02 रिक्त जागा
कनिष्ठ अभियंता (स्टोअर्स): 08 रिक्त पदे
एचआर सहाय्यक- I: 01 रिक्त
एचआर सहाय्यक -२: ० V रिक्त पदे
नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी MMRDA official website - www.mmrda.maharashtra.gov.in
पगार विभागीय अभियंत्याला Rs. 9300-34800 GP-4400 Corresponding 7th PC Pay Scale- S-15, Rs.41800- 132300 respectively.
सुरूवातीला लेखी परीक्षा घेण्यात येईल. यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल. यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. परीक्षेविषयी अधिक माहिती वेबसाईटवर वाचा.
खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा फी ३०० रूपये असेल, तर राखीव उमेदवारांसाठी दीडशे रूपये असणार आहे. mmrda.maharashtra.gov.in
नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी MMRDA official website - www.mmrda.maharashtra.gov.in