मुंबई : कार्यकर्त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांसाठी आणलेले, हारतुरे हे थेट खुर्च्यांना घातले, कारण शुभेच्छांसाठी कार्यकर्त्यांनी हार, तुरे आणले पण पदाधिकारीच वेळेवर पोहोचले नाहीत, अशा लेचलतीफ पदाधिकाऱ्यांना अद्दल घडवण्यासाठी हे पाऊल कार्यकर्त्यांनी उचललं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्यकर्त्यांना दिलेली वेळ न पाळल्यांनं पदाधिकाऱ्यांना हो रोष सहन सोसावा लागला आहे. यानंतर कार्यकर्त्याने हे फोटो सोशल मीडियावर देखील शेअर केले आहेत.


नेमकी घटना काय घडली ?


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परवा पक्षाची वाहतूक सेनेची नवी कार्यकारिणी जाहीर केली. संजय नाईक यांना वाहतूक सेनेचे अध्यक्ष, नितीन नांदगावकर यांना सरचिटणीस आणि चंद्रकांत वंदे यांची खजिनदार पदावर नेमणूक केली.


पक्षाचे वरळी विभागातील पदाधिकरी संजय जामदार हे संजय नाईक आणि त्यांच्या सहकाऱयांना वाहतूक सेनेच्या एल्फिस्टन रोड येथील कार्यालयावर शुभेच्छा देण्यासाठी काल गेले.


सहकाऱयांची दोन तास वाट पाहिली


संजय जामदार यांनी संजय नाईक आणि त्यांच्या सहकाऱयांची दोन तास वाट पाहिली, पण ते आले नाहीत. त्यामुळे शेवटी कंटाळून जामदार यांनी उपहासात्मक पद्धतीनं आपल्या भावना नाईक यांच्यापर्यंत पोचवल्या.


हार तुऱ्यांचा असा वापर


शुभेच्छा देण्यासाठी सोबत आणलेले हार, तुरे त्यांनी संजय नाईक तसंच त्यांच्या सहकाऱयांच्या खुर्चीला चिटवले आणि कार्यालयातून निघून गेले. सध्या हे फोटो समाजमाध्यमांवरील मनसेच्या सर्व ग्रुपवर व्हायरल झाले आहेत. त्याला कार्यकर्त्यांमध्ये फोटोंची जोरदार चर्चा. या घटनेमागे वाहतूक सेनेतील अंतर्गत गटबाजीही कारणीभूत असल्याचं सांगण्यात येत आहे.