मुंबई : मालाड येथे मनसे कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या दोन फेरीवाल्यांना मनसेने पोलिसांच्या ताब्यात दिलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे दोन्ही फेरीवाले परराज्यात जाण्याच्या तयारीत होते. मारहाण केल्यापासूनच हे दोघे फरार झाले होते आणि भांईंदरमध्ये मुक्कमाला होते.


मनसे कार्यकर्त्यांनी सापळा रचून त्यांना शोधून काढलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. मारहाणीच्या कबुली जबाबची संपूर्ण व्हिडिओ क्लिप मनसेच्या कार्यकर्त्यांनी रेकॉर्ड केलीय.


या प्रकरणात ७ फेरीवाल्यांना याआधीच पोलीसांनी ३०७ कलमांतर्गत अटक केलीय. तसेच संजय निरुपम यांच्यावरही गुन्हा दाखल केलाय.


मनसे विभाग प्रमुख सुशांत माळवदे मालाड स्थानकाबाहेर फेरीवाल्यांनी जबर मारहाण करत त्यांना गंभीर जखमी केले. या मारहाणीत सुशांत माळवदे यांच्या डोक्‍याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


माळवदे यांना मारहाण झाल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते कालपासूनच आक्रमक झाले आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांनी दादर स्थानकाजवळील फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड केली. तसेच वाशी रेल्वे स्थानकाबाहेरही फेरीवाल्यांच्या सामानाची तोडफोड व नासधूस करण्यात आली.


या हल्ल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी 'जैसी करनी वैसी भरनी' म्हणत समर्थन केलं होतं. यासोबतच मालाडमध्ये संज. निरुपम यांनी कोणतीही परवानगी न घेता सभा घेतली होती. त्यामुळे निरुपम यांच्यावर विनापरवानगी सभा घेणे आणि प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.