मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Tahckeray) यांची येत्या 12 तारखेला ठाण्यात सबा होणार आहे. सभेपूर्वी मनसेत अनेक घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सभेची मनसने जोरदार तयारी सुरु केली आहे. सभेपूर्वी मनसेकडून एक टीझर रिलीज करण्यात आला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यंनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. 


गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवावेच लागतील असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटले. राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया आल्या. मनसेच्या टीझरमध्ये अजित पवार, संजय राऊत आणि शरद पवार यांनी केलेल्या प्रतिक्रिया दाखवण्यात आल्या असून या सर्व टीकांना राज ठाकरे करारा जबाब देणार असं म्हटलं आहे. 



याआधी मनसे नेते अमेय खोपकर यांनीही ट्विट करत इशारा दिला होता. शिवतिर्थावरील एका सभेने तुमची झोप उडाली, मग १२ तारखेला ठाण्यात उत्तरसभा झाल्यानंतर तुमचं काय होईल..? असा सवाल त्यांनी विचारला होता.



येत्या काही महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुढीपाडव्याच्या भाषणात राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर चौफेर टीका केली होती. आगामी महापालिका निवडणुकीत महाराष्ट्रात मनसेच एक सक्षम पर्याय असू शकेल, असा विश्वास सर्वसामान्यांना देण्याचा प्रयत्न मनसेने केला आहे. 


आता 12 एप्रिलला ठाण्यात होणाऱ्या मनसेच्या सभेत राज ठाकरे काय उत्तर देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.