मुंबई : मनसेच्या खळ्ळखटॅकनंतर (MNS aggressive) अॅमेझॉन (amazon) कंपनी नरमल्याचे दिसत आहे. मनसेसोबत (MNS) चर्चा करण्याची अॅमेझॉनची तयारी आहे. मात्र मागणी मान्य केल्याशिवाय चर्चा नाही, असा मनसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे विरुद्ध अॅमेझॉन कंपनी यांच्यात मराठी भाषेवरून (Marathi Language ) सुरू झालेल्या संघर्षात अखेर अॅमेझॉनने (amazon) नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ई-कॉमर्समधील आघाडीची कंपनी अॅमेझॉनने इतर अन्य प्रादेशिक भाषेला महत्व दिलेले आहे. मात्र, मराठीबाबत आकस कशाला, असा सवाल करत मनसेने मराठीला प्राधान्य न दिल्याने खळ्ळ खटॅकनंतर करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अॅमेझॉन कंपनीकडून चर्चेची तयारी असल्याचे सांगण्यात आले. अॅमेझॉननं चर्चेची तयारी असली तरी  अॅमेझॉनच्या वेबसाईटवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून दिल्याशिवाय चर्चा होणार नाही, असं मनसे विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, अॅमेझॉनकडून आठवडाभरात मराठीला स्थान देण्यात येईल, असे सांगण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.



न्यायालयात लढा सुरू असतानाच मनसेने अॅमेझॉनविरोधात आक्रमक पवित्रा घेत कार्यालयांमध्ये तोडफोड सुरू केली. आज सकाळी पुण्यामध्ये कोंढवा इथे अॅमेझॉनच्या ऑफिसची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर मुंबईतील साकीनाका आणि वसईतील सातिवली भागातील अॅमेझॉनच्या कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.