मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे  (Raj Thackeray) यांनी भोंगा प्रकरणी दिलेल्या आदेशानंतर राजकारण चांगलेच पेटलं आहे. मशिदीवरील भोंग्यांनंतर आता मनसेनें गोमांस विक्रीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. स्विगीसह (Swiggy) इतर काही ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपन्यांकडून मुंबईत थेट गोमांस विक्री केली जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संबंधित कंपन्यांच्या संचालकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात मनसेने केली आहे. तसं न केल्यास येत्या काळात आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. तसंच मुंबईत होणाऱ्या गोमांस विक्रीबाबत मनसेनं गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेत निवेदन दिल्याची माहिती मिळतेय.


पुण्यात मनसेला मोठा धक्का
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुण्यात मोठी गळती लागली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भोंग्यांबाबतच्या वक्तव्यानंतर पुण्यातील मनसेत मोठ्या घडामोडी घडत आहेत. मनसेचा पुण्यातील प्रमुख चेहरा असलेल्या वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले असतानाच आता आणखी एका पदाधिकाऱ्यांने राजीनामा दिला आहे. शहराचे उपाध्यक्ष अझरुद्दीन बशीर सय्यद यांनीसुद्धा मनसेला शेवटचा जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.