मुंबई : अभिनेता सोनू सूदवरून वाद पेटला आहे. सोनू सूदच्या कामावर शिवसेना नेते संजय राऊतांनी शंका उपस्थित केली आहे. सामनातील 'रोखठोक' या सदरात संजय राऊत यांनी सोनू सूदला दत्तक घेऊन भाजप नेते उत्तर भारतीय व्होटबँकेचे राजकारण करु पाहत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावर भाजपकडून टीका करण्यात आली आहे. आता मनसेने देखील संजय राऊतांच्या वक्तव्यांवर टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. 'या सगळ्यात आपण हा अग्रलेख लिहीण्या पलिकडे काय केलत? ज्याने काम केलय त्याचं कौतुक करूया... मनाचा मोठेपणा दाखवुया... असो ‘रडण्या’ पलिकडे तुमच्याकडुन काय अपेक्षा ठेवणार... ' असं ट्वीट अमेय खोपकरांनी केलं आहे.   (सोनू सूदला 'दत्तक' घेऊन भाजपकडून उत्तर भारतीय व्होटबँकेचे राजकारण- राऊत) 



भाजप आमदार राम कदम यांनीही संजय राऊत यांच्या आरोपावर प्रत्युत्तर दिलं आहे. 'स्वतःही करायचं नाही @Sonu Sood सारखे लोक माणुसकीसाठी पुढे येऊन गोरगरिबांना मदत करत असतील त्यांचं कौतुक करायचं सोडून त्यांच्यावर @rautsanjay61 टीका? हाच आहे का तुमचा माणुसकीचा धर्म?' असं ट्विट राम कदम यांनी केलं आहे. (सोनू सूदच्या बचावासाठी भाजप पुढे सरसावले... राऊतांना चोख प्रत्युत्तर) 


 


दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलंय की,'संपूर्ण  महाराष्ट्रात हॉस्पिटल मध्ये जागा नाही ? म्हणून लोक घरी तडफडून मरता आहेत ? प्रत्येक घराघरात उपासमार सुरू आहे ?मात्र तुम्ही गरिबाला एका पैशाची अजून मदत केली नाही दुसरे करतात त्यांना तरी करू द्या' असं म्हणत संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग केलं आहे.