`त्या` थिएटर्सची लायसन्स रद्द करा, मनसेची मागणी
मराठी सिनेमांना प्राईम टाईम स्क्रीन्स न देणाऱ्या थिएटर्सची लायसन्स रद्द करावीत अशी मागणी मनसेने केली आहे.
मुंबई : मराठी सिनेमांना प्राईम टाईम स्क्रीन्स न देणाऱ्या थिएटर्सची लायसन्स रद्द करावीत अशी मागणी मनसेने केली आहे. 'देवा' सिनेमाला स्क्रीन्स मिळाव्या यासाठी मनसे चित्रपट सेनेने नुकतीच पत्रकार परिषद घेतली आहे.
ही मागणी पूर्ण झाली नाही तर मनसे खळखट्याक करेल असा इशारा दिला मनसेने दिला आहे.
२२ डिसेंबर ला मराठी सिनेमा 'देवा' आणि हिंदी सिनेमा 'टायगर जिंदा है' रिलीज होत आहेत. 'टायगर' सिनेमाची अॅडव्हान्स बुकींग सुरू झाली आहे. याची तिकीट १६०० ते २००० पर्यंत आहे.
यामध्ये 'देवा' सिनेमाला स्क्रीन्स मिळतात का ? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.
'थिएटर्सचे लायसन्स रद्द करा'
'कायद्याप्रमाणे मराठी सिनेमांना प्राईम टाईम मिळणे गरजेचे आहे. जर थिएटर मालक तसे करत नसतील तर त्यांचे लायसन्स रद्द करा' अशी मागणी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केले आहे.