मुंबई : गेले काही दिवस भोंगा आणि हनुमान चालीसा यामुळे राज्यातील वातावरण चांगलचं तापलं. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Raj Thackarey ) यांनी ५ जूनला अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ( Aadity Thackarey ) यांनीही अयोध्यावारीचा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून शिवसेना ( Shivsena ) आणि मनसे ( MNS ) कार्यकर्त्यांमध्ये एकच जुंपली आहे. शिवसेनेने 'नकली से सावधान, आ रहा है असली' अशी पोस्टरबाजी करत मनसेला डिचवले.


शिवसेना आणि मनसेमधील हा संघर्ष शिगेला पोहोचला असतानाच मनसे नेते आणि प्रवक्ते गजानन काळे ( MNs Gajann Kale ) यांनी ट्विट करून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. गजानन काळे यांनी एका सभेचा फोटो ट्विट केला आहे. शिवसेनेच्या एका सभेचा फोटो आहे. पण, व्हिडीओमध्ये जी गर्दी दाखविण्यात आली आहे ती मनसेच्या सभेची आहे, असा आरोप गजानन काळे यांनी केला आहे.



माणसं जमा करायला अजून राजसाहेबांचाच आधार घ्यावा लागतो का? असा सवाल करतानाच गजानन काळे यांनी 'असली नकली म्हणणाऱ्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. काही तरी अस्सल हे तुमचे असु द्या. इतके ही नकली होऊ नका. ही चूक लक्षात आल्यावर ते ट्विट डिलिट करण्याची नामुष्की शिवसेनेवर आली. नकली हिंदुत्ववादी.. असा जबरदस्त टोला शिवसेनेला लगावला आहे.