पाहा असं असेल राज ठाकरेंचं शॅडो कॅबिनेट
अपना टाईम आएगा.....
नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १४व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सोहळ्यामध्ये पक्षाध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षातील कार्यकर्ते आणि नेतेमंडळींच्या उपस्थितीत मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली. मनसेच्य़ा बऱ्याच नेत्यांना आणि प्रकाशझोतात असणाऱ्या चेहऱ्यांना या शॅडो कॅबिनेटमध्ये काही महत्त्वाची पदं आणि तितक्याच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
मनसेच्या बाळा नांदगावकर यांनी उपस्थितांचं स्वागत केल्यानंतर, अनिल शिदोरे यांनी या शॅडो कॅबिनेटची यादी सर्वांपुढे वाचली. ज्यामध्ये एकाहून अधिक व्यक्तींनाही एक-एका खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच मनसेच्या वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन मुंबईबाहेर करण्यात आलं. त्यातही राज ठाकरे या सोहळ्याच्या वेळी काय बोलणार याकडेच साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करत विरोधात असलो तरीही सरकारने चांगलं काम केल्यास त्याचं अभिनंदनही केलं गेलं पाहिजे हा मुद्दा मांडला. सोबतच आपल्या पक्षांची साथ देणाऱ्या जनतेचे आभारही मानले.
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शॅडो कॅबिनेटची संपूर्ण यादी पुढीलप्रमाणे
गृह- बाळा नांदगावकर
जलसंपदा- अनिल शिदोरे
ऊर्जा- शिरीष सावंत, मंदार हळबे, सागर देवरे, विनय भोईटे
ग्रामविकास- जय प्रकाश बाविस्कर, अमित ठाकरे, अनिल शिदोरे, सुरेश शिंदे
वने, मदद पुनर्वसन- संजय चित्रे, अमित ठाकरे, वगिश सारस्वत, संतोष धुरी
शिक्षण- अभिजित पानसे, आदित्य शिरोडकर, सुधाकर तांबोळी, चेतन पेडणेकर, अमोल रोगये
कामगार- राजेंद्र वागस्कर, गजानन राणे
नगरविकास, पर्यटन- संदीप देशपांडे, अमित ठाकरे, किर्तीकुमार शिंदे, उत्तम सांडव, योगेश चिले
सार्वजनिक आरोग्य, कुटूंब कल्याण- कुंदा राणे, रिटा गुप्ता
अन्न व नागरी पुरवठा- राजा चौगुले, महेश जाधव
संस्कृतीक- अमेय खोपकर
कौशल्य विकास- स्नेहल जाधव
भटक्या जाती कल्याण- गजानन काळे
संस्कृतीक -अमेय खोपकर
कौशल्य विकास- स्नेहल जाधव
भटक्या जाती कल्याण- गजानन काळे
ग्राहक संरक्षण- प्रमोद पाटील
राज्य उत्पादन शुल्क- वसंत फडके
आदिवासी विकास- किशोर जाचक, परेश चौधरी
पर्यावरण- रुपाली पाटील, किर्तीकुमार शिंदे, जय शृंगारपुरे
पाणी पुरवठा- अरविंद गावडे
क्रीडा- विठ्ठल लोकणकर
मराठी भाषा, माहिती व तंत्रज्ञान - केतन जोशी