corona | मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोनामुक्त
मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोनामुक्त झाले आहेत. राज ठाकरे यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. राज ठाकरे यांची बहीण आणि आई या देखील कोरोनामुक्त झाल्या आहेत.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोनामुक्त झाले आहेत. राज ठाकरे यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. राज ठाकरे यांची बहीण आणि आई या देखील कोरोनामुक्त झाल्या आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ते लीलावती रुग्णालयात उपचार घेऊन घरी परतले होते. काही दिवस ते घरीच क्वारंटाईन होते. त्यानंतर आता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.