Raj Thackeray : देशातील सरकारी संस्थांच्या खासगीकरणाच्या (Privatization) मुद्द्यावरुन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर सातत्याने टीका करण्यात येत असते. सरकारी संस्था कंत्राटी माध्यमातून चालवल्या जातात किंवा खासगी व्यावसायिकांना विकल्या जात असल्याचा आरोप सरकारवर केला जातोय. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही खासगीकरणाच्या मुद्द्यावरुन अनेकदा टीका केली आहे. अशातच आता मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा रकारकडून गोष्टी काढायच्या आणि खासगी लोकांच्या घशात घालायच्या एवढाच प्रकार सुरु आहे असे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील वीजेटीआय महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. यावेळी एका विद्यार्थ्याने राज्यातील शिक्षण व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याबाबत राज ठाकरे यांनी सरकारी व्यवस्थेवरही निशाणा साधला. 


"या प्रश्नाचे आधी आलेली सरकारे आणि आताचे सरकार यातून मला उत्तर सापडत नाही. आता कोणत्याही निवडणुका नाहीत पण एक वाक्य टाकून देतो. या गोष्टीचे उत्तर तुमच्यासमोर उभं आहे. पूर्वीच्या काळी इतिहासामध्ये इंच इंच लढवू असे वाक्य होते. सध्याचे वाक्य हे इंच इंच विकू आहे. जे दिसेल ते विकायचे एवढा उद्योग फक्त सुरुय. सरकारकडून गोष्टी काढायच्या आणि खासगी लोकांच्या घशात घालायच्या एवढाच प्रकार सुरु आहे. परदेशात मुलं नुसती शिक्षणासाठी जात नाहीत. आजूबाजूचे जे वातावरण आहे त्यासाठी ते जातात. या सगळ्या गोष्टी बघून भारतात येतो. भारत हा सुंदर आहे पण आणखी सुंदर करता येईल. पण या लोकांना करायच्या नाहीत," असे राज ठाकरे म्हणाले.


मी फक्त शिवभक्त नाही तर शिववेडा आहे - राज ठाकरे


"शिवजयंती केवळ हार घालण्यापुरता मर्यादीत ठेऊ नका. शिवाजी महाराजांना समजवून घेतलं पाहिजे. मी केवळ शिवभक्त नाही तर शिववेडा आहे. पण मी कधी त्याचा आव आणत नाही. मी त्यांचे विचार आत्मसात करतो," असेही राज ठाकरे म्हणाले.


भाषण द्यायचं असतं तेव्हा हाताला मुंग्या येतात


"ज्या दिवशी मला भाषण द्यायचं असतं, तो माझा सर्वात वाईट दिसत असतो. माझ्या हाताला मुंग्या आलेल्या असतात. हातपाय थंड पडलेले असतात. कोणला हे खरं वाटत नाही, पण हे सत्य आहे," असे राज ठाकरे म्हणाले.