Raj Thackeray Rally : बुधवारी शिवाजी पार्कवर (Shivaji Park) होणाऱ्या मनसेच्या (MNS) गुढीपाडवा मेळाव्यात (Gudhi Padva Rally) राज ठाकरे (Raj Thackeray) कुणाचा समाचार घेणार, हे दाखवणारा हा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणं यंदाही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे यांची तोफ शिवतीर्थावर धडाडणार आहे. शिवसेनेची शकलं होऊन सहा महिने उलटून गेलेत. ठाकरेंच्या हातातून शिवसेना (Shivsena) गेलेली असताना, राज ठाकरे आपल्या भावाच्या मदतीला पुढं येणार का, अशी चर्चा रंगतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण? 
ठाकरे विचार जपण्यासाठी शिवतीर्थावर या, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. याचाच अर्थ उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हेच राज ठाकरेंचं पहिलं टार्गेट असतील, असं मानलं जातंय. महाराष्ट्रातल्या शिंदे विरुद्ध ठाकरे (Shinde vs Thackeray) सत्तासंघर्षाचा ते समाचार घेतील. मशिदीवरच्या भोंग्याचा मुद्दा काढून ते पुन्हा एकदा कट्टर हिंदुत्ववादी भूमिका मांडतील, अशी अपेक्षा आहे. संभाजीनगर नामांतरला एमआयएमचा विरोध, लव्ह जिहादसारख्या मुद्यांवरही ते परखड भाष्य करण्याची शक्यता आहे.


मनसेचा टीझर
17 मार्चला मनसेने गुढीपाडव्या रॅलीचा टीझर प्रदर्शित केला होता. यात ॥ ठाकरी तत्त्व, मराठी सत्त्व आणि धर्माभिमानी हिंदुत्व ॥, असं कॅप्शन देण्यात आला होता. हा टेलर असून पूर्ण पिक्चर गुढी पाडव्याला शिवतिर्थावर दिसणार असल्याचे मनसेतर्फे सांगितलं जात आहे. मनसेच्या नव्या टिझरमध्ये मराठी, हिंदू आणि महाराष्ट्राच्या मुद्द्यावर भर देण्यात आला आहे. हिंदू या 2 अक्षरांसाठी जगा, मराठी या 3 अक्षरांवर प्रेम करा, महाराष्ट्र या 4 अक्षरांसाठी काम करा, राज ठाकरे या 5 अक्षरे नेहमीच पाठीशी असतील, असं या टीझरमध्ये सांगण्यात आलं आहे. 22 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थावर सभा होणार आहे. 


राज ठाकरेंनी आतापर्यंत अनेकवेळा आपली राजकीय दिशा बदलली आहे. महाराष्ट्रातल्या ताज्या सत्तासंघर्षानंतर आपली नेमकी दिशा त्यांनी अजून स्पष्ट केलेली नाही. गुढीपाडवा मेळाव्यात ते मनसेची नवी राजकीय दिशा स्पष्ट करतील. आगामी निवडणुका मनसे स्वबळावर लढणार की, भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसोबत युतीची गुढी उभारणार, याची घोषणा या सभेत होण्याची शक्यता आहे.