देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे Raj Thackeray  यांच्या घरी काम करणाऱ्या दोन व्यक्तींना कोरोना व्हायरसची Coroanvirus लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारीच राज ठाकरे यांच्या दोन चालकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर आता कोरोना व्हायरसने थेट राज ठाकरे यांच्या घरात शिरकाव केला आहे. त्यामुळे कृष्णकुंजवर सध्या चिंतेचे वातावरण आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'हे' दोन महिने जास्त धोकादायक, कोरोना रुग्ण वाढण्याची आरोग्यमंत्र्यांना भीती



दादरच्या शिवाजी पार्क परिसरात राज ठाकरे यांचे कृष्णकुंज हे निवासस्थान आहे. दादर, माहीम आणि धारावी हा परिसर पालिकेच्या जी नॉर्थ या वॉर्डात येतो. काही दिवसांपूर्वी या वॉर्डात मोठ्याप्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडत होते. मात्र, आता कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट असलेल्या धारावीतील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. मात्र, माहीम आणि दादर परिसरात अजूनही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत.


गोव्यात कोरोनाच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात; मुख्यमंत्र्यांची धक्कादायक कबुली

काही दिवसांपूर्वी कृष्णकुंजपासून काही अंतरावर असणाऱ्या शिवसेना भवनातही कोरोनाचा शिरकाव झाला होता. यानंतर शिवसेना भवनात सॅनिटायझेशन करण्यात आले होते. तसेच शिवसेना भवन एका आठवड्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे १,२९७ नवे रुग्ण आढळून आले. तर ११७ जणांचा मृत्यू झाला. सध्याच्या घडीला मुंबईत २८,३६६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत ३९,७४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.