नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यावर गुन्हा दाखल
2008 साली गजानन काळे यांचं झालं होतं लग्न
नवी मुंबई : नवी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यावर पत्नीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरूळ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानसिक आणि शारीरिक छळवणूक करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आदी कलमांखाली नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (MNS City President Gajanan Kale wife filed complaint against him blaming physical and mental trouble ) या घटनेमुळे नवी मुंबईत आणि मनसेच्या गोटात खळबळ उडाली आहे.
मानसिक आणि शारिरीक छळवणूक करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून गजानन काळे आपल्याला मारहाण करीत असून जातीवाचक शिवीगाळ करीत असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. त्याचबरोबर गजानन काळे यांचे बाहेरील महिलांशी संबंध असल्याने आपल्यावर घरात अन्याय करीत असल्याचाही आरोप पत्नीने नोंदवलेल्या FIR मध्ये केला आहे.
गजानन काळे यांच्यावर पत्नीने केले हे आरोप
'२००८ मध्ये आमचं लग्न झालं. लग्नानंतर 15 दिवसांनी गजानन माझासोबत किरकोळ घरगुती कारणावरून भांडण करून माझा सावळा रंग व माझी जात या कारणावरून मला टोमणे मारू लागला. जातीवाचक शिवीगाळ करू लागला. तो मला बोलला की, तू सावळी आहेस, तुझी जात वेगळी आहे तरी देखील मी तुझ्याशी लग्न केले आहे. माझी चूक झाली. तुझ्या वडिलांची पोस्ट बघून मी तुझ्याशी लग्न केले परंतु त्याचा मला काही एका फायदा झाला नाही असे बोलला. तेव्हा आमच्या दोघांमध्ये भांडण झाले होते, त्यावेळी गजानन याने मला मारहाण केली होती' असंही त्यांच्या पत्नीने पोलिसांना एफआयआरमध्ये सांगितलं आहे.