मुंबई : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील ( Imtiyaz Jalil ) यांनी राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. एमआयएमचे आमदार काँग्रेसला मतदान करणार आहेत असे त्यांनी ट्विट केले आहे. मात्र, एमआयएमच्या या भूमिकेवरून मनसेने शिवसेनेवर टीका केलीय.      


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसे प्रवक्ते योगेश खैरे ( MNS YOGESH KHAIRE ) यांनी शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM UDDHAV THACKAREY ) यांनी संभाजीनगर सभेत एमआयएमबद्दल हू का चू केले नाही. उलट त्यांचीच स्क्रिप्ट वाचण्यात आली आणि आता एमआयएम - सपाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा घेतला जात आहे. शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील की नाही हे कळेलच. पण, त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेचा आज पराभव होतोय, असे प्रवक्ते योगेश खैरे यांनी म्हटलंय.


 



तर, मनसे प्रवक्ते गजानन काळे ( MNS GAJANAN KALE ) यांनी "राज्याची शोभा" होईल अशी ही राज्यसभा निवडणूक सुरू असल्याची टीका केलीय. जनता असंख्य अडचणींचा सामना करत असताना सत्ताधाऱ्यांचा पंचतारांकित निवडणुकीचा खेळ सुरू आहे. निजामाची अवलाद एमआयएमची मदत घेऊन जनाची नाही पण मनाचीही महाविकास आघाडीने सोडली आहे. शिवसेनेचं नकली आणि ढोंगी हिंदुत्व उघडं पडलं आहे अशी टीका त्यांनी केली आहे.