मनसे गुडीपाडवा: राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
आजच्या भाषणात राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर टीका केली. पण, आपल्या भाषणात नुसतीच टीका न करता महाराष्ट्र, मुंबई आणि मराठी माणूस तसेच, देशातील सामाजिक वातावरण, अर्थव्यवस्था आदींबाबात महत्वपूर्ण तितकेच गंभीर मुद्देही उपस्थित केले.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुडीपाडवा मेळाव्यात आपल्या खास शैलीत फटकेबाजी केली. या फटकेबाजीचे जोरदार तडाखे राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकार, पंतप्रधान मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना बसले. आजच्या भाषणात राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर टीका केली. पण, आपल्या भाषणात नुसतीच टीका न करता महाराष्ट्र, मुंबई आणि मराठी माणूस तसेच, देशातील सामाजिक वातावरण, अर्थव्यवस्था आदींबाबात महत्वपूर्ण तितकेच गंभीर मुद्देही उपस्थित केले. आजच्या (रविवार, १८ मार्च २०१८) भाषणात शिवाजी पार्कवरून काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
मुंबई | भविष्यात सत्तापरिवर्तन झाले आणि नोटबंदीची चौकशी झाली तर,या देशातील १९४७ नंतरचा सर्वात मोठा घोटाळा बाहेर येईल - राज ठाकरे
मुंबई | नरेंद्र मोदींनी जगभर फिरून एक पैसाही आणला नाही - राज ठाकरे
मुंबई | भारताला झालेला भाजप, मोदी आजार दूर करण्यासाठी सर्व पक्षांणी एकत्र या - राज ठाकरे
मुंबई | वडापाव विकणे हा जर रोजगार असेल तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभर काय वड्यासाठी पिठ मागयाला फिरत आहेत काय ? - राज ठाकरे
मुंबई | मोदीमुक्त भारत व्हायला हवा - राज ठाकरे
मुंबई | आतापर्यंत भारताला दोन वेळा स्वातंत्र्य मिळालं. पहिलं १९४७ दुसरं १९७७ला आता तिसरं २०१९ला मिळालं पाहिजे - राज ठाकरे
मुंबई | राम मंदिराच्या मुद्द्यांवर दंगली घडवल्या जातील - राज ठाकरेंचा आरोप
मुंबई | बाहेरून येणाऱ्या मुस्लिमांचे मोहोल्ले उभे केले जात आहेत. ते खोटेच जाळले जात आहेत. पुढे त्यावर पक्की घरे, इमारती उभा केली जात आहेत - राज ठाकरे
मुंबई | निवडणुकांसाठी भविष्यात जातीय, धार्मिक दंगली घडवल्या जातील - राज ठाकरे
मुंबई | महाराष्ट्रातील (मुंबई) कार्यालये गुजरातला पळवली जातायत. त्यामुळे मराठी माणसांच्या नोकऱ्या हिराऊन घेेतल्या जातायत - राज ठाकरे
मुंबई | नरेंद्र मोदींच्या हट्टासाठी महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा - राज ठाकरे
मुंबई | पंतप्रधान झाल्यावरही मोदींना गुजरातचेच प्रेम अधिक - राज ठाकरे
मुंबई | राफेल विमानाच्या खरेदीबाबत सोईस्कर मौन बाळगले जात आहेत - राज ठाकरे
मुंबई | सध्याच्या सरकारमध्ये बोफोर्स घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा झाला आहे. पण, त्याच्या बातम्या बाहेर येत नाहीत - राज ठाकरे
मुंबई | राज्यत सध्या सत्तेवर असलेलेल मुख्यमंत्री हे बसवलेले- राज ठाकरे
मुंबई | महाराष्ट्रात रोजगार आहे. पण, आम्ही आरक्षणासाठी भांडतोय. परप्रांतिय आमचे रोजगार पळवून नेतायत - राज ठाकरे
मुंबई | आमचे मराठी लोकच चिरीमिरी घेत आहेत. त्यामुळे परप्रांतियांचे फावते आहे. - राज ठाकरे
मुंबई | राज्यात दलाल राज्य करत आहेत - राज ठाकरे
मुंबई | मी विरोधासाठी विरोध करणारा माणूस नाही. सरकारने चांगले काम केले तर कौतुक करेन - राज ठाकरे
मुंबई | पैसे नसताना नितिन गडकरी कोट्यवधींच्या गोष्टी करतात - राज ठाकरे
मुंबई | अक्षय कुमार हा भारतात जन्मलेला पण कॅनडाचा नागरिक असलेला अभिनेता - राज ठाकरे
मुंबई | यापुढे प्रत्येक वर्षी गुडीपाडव्याला मेळावा होणार - राज ठाकरे
मुंबई | सरकारच्या बाजूने बातम्या नाही दिल्या तर, जाहीराती बंद करू. सरकारची (मोदी, अमित शहा) प्रसारमाध्यमांना धमकी - राज ठाकरे
मुंबई | प्रसारमाध्यमांतून बातम्या काय द्यायच्या हे सरकार सांगते - राज ठाकरे
मुंबई | अभिनेत्री श्रीदेवीचा मृतदेह राष्ट्रध्वजात गुंडाळणे ही महाराष्ट्र सरकारची चूक - राज ठाकरे
मुंबई | मुख्यमंत्री फडणवीस म्हणजे वर्गातला मॉनिटर, जो शिक्षिकांना आवडतो पण, विद्यार्थ्यांना नाही - राज ठाकरे
मुंबई | अर्थमंत्री मुनगंटीवार म्हणजे शोलेतला सांबा आणि रजनीकांतचा बारावा डमी - राज ठाकरे
मुंबई | ज्यांना मनसे पक्ष संपला त्यांनी ही गर्दी पहा आणि ठरवा