मुंबई : मुंबई महानगरपालिकेतल्या सहा नगरसेवकांबाबत कोकण विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला मनसेनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकण विभागीय आयुक्तांनी 'त्या' सहा नगरसेवकांबाबत दिलेला आदेश बेकायदेशीर असल्याचं मनसेचं म्हणणं आहे.


मनसेला नगरसेवकांनी दिला डच्चू


गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दिवाळीआधीच मनसेच्या मुंबईतल्या सात पैंकी सहा नगरसेवक 'फोडले' होते. मनसेच्या या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचं पत्र विभागीय कार्यालयला दिलं.. आणि त्यानंतर मनसेच्या या सहा नगरसेवकांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. 'ही फोडाफोडी नसून घरवापसी आहे, मनसेतून शिवसेनेत आलेले हे सर्व नगरसेवक हे मूळचे शिवसैनिकच आहेत त्यामुळे ते आमचेच आहे', असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं होतं.