मुंबई : चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरु असताना उभे राहणे बंधनकारक नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं नुकताच दिला होता. न्यायालयाच्या या निर्वाळ्या विरोधात मनसेकडून बंड करण्यात आलं आहे.


 वाद निर्माण होण्याची चिन्ह


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी tweet करून व्यक्त केली भावना. खोपकर यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेबाबत नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह.


काय म्हणालं होतं कोर्ट?


चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरु असताना उभे राहणे बंधनकारक नाही असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं नुकताच दिला होता. राष्ट्रगीतावेळी उभे राहणे म्हणजे देशभक्ती सिद्ध होते असे नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं. न्यायालयाच्या या निर्वाळ्यावर खोपकर यांनी तीव्र रोष व्यक्त केलाय.




काय म्हणाले खोपकर?


जन गण मन की बात...न्यायाधीश कोर्टात येतात तेव्हा उभं राहीलं नाही तर कोर्टाचा अवमान होईल का? मी नाही उभा राहणार, हे पक्कं ठरवलंय. शेवटी न्यायाधीशांपेक्षा राष्ट्रगीत केव्हाही मोठंच नाही का?


खोपकर यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेबाबत नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह.