देवेंद्र कोल्हटकर / मुंबई : MNS leader Amit Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) युवा नेतृत्व अमित राज ठाकरे. ( Amit Thackeray) उद्या 23 जानेवारी रोजी त्यांच्या राजकीय कारकीर्दीला दोन वर्ष पूर्ण होत आहे. या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्ताने एक चर्चा सुरु झाली आहे. अमित ठाकरे यांच्यासाठी आगामी काळ आव्हानात्मक असणार आहे. अगदी तोंडावर मुंबई महापालिका निवडणूक आली आहे. ठाकरे घराण्यातील युवा नेतृत्वाची नेहमी चर्चा होत असते. युवा शिवसेना नेते मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपला राजकारणातील आपला ठसा दाखवून दिला आहे. त्याचप्रमाणे आता अमित ठाकरे दाखवू शकतात का, याची चर्चा सुरु झाली आहे. कारण त्यांनी दोन वर्षांपासून राजकारण जवळून पाहिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेले काही दिवस सोशल मीडियावर अमित राज ठाकरे यांच्याबाबतच्या अनेक पोस्ट, शेअर होत आहेत. निमित्त आहे, मनसेच्या नेतेपदी त्यांची निवड झाली. त्या दिवसाला उद्या दोन वर्ष होत आहेत. द्वितीय वर्षपूर्तीची मनसे कार्यकर्ते 'हाच तो ऐतिहासिक क्षण', 'अमितपर्व', 'मनसेचा नवा अध्याय' या शीर्षकांनीं अमित ठाकरे यांच्याविषयीच्या पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.


दोन वर्षांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी सक्रिय राजकारणात मनसेच्या पहिल्या महाअधिवेशनात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी विविध समाज घटकांबद्दलचे प्रश्न हाताळण्यास सुरुवात केली, अशी माहिती मनसेकडून देण्यात आली.


एमपीएससीच्या विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत, आरोग्य सेविकांपासून ई-कॉमर्स कामगारांपर्यंत अनेकांच्या समस्यांना- प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. नोकरभरती, रस्त्यांवर पडणारे खड्डे, अस्वच्छ समुद्र किनारे आदी विषयांवर मार्मिक- परखड मतं व्यक्त करुन त्यांनी आपल्या भावी राजकारणाची दिशा दाखवून दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इतिहासात एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली, अशी मनसे कार्यकर्त्यांनी भावना आहे.


कोरोना काळात त्यांनी विविध प्रश्नांवर आवाज उठवला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार केला. मुख्यतः आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीत ही लक्ष घातले आहे. त्यामुळे ती या निवडणुकीत काय करिष्मा दाखवतात, याचीच उत्सुकता आहे.


अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी या वर्षी लागणार आहे. कारण अनेक महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुका या तोंडावर आल्या आहेत त्यातच मुंबई महानगरपालिका निवडणूक मनसेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. एकीकडे शिवसेनेत मुंबई महानगरपालिका निवडणुकीची धुरा पर्यटन आणि पर्यावरण मंत्री युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वर आहे. मनसेत ही मनसेचे युवा नेते अमित ठाकरे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावणार आहेत.