मुंबई : शिवसेनेतील (Shivsena) फूटीनंतर ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटाचे (CM Eknath Shinde) असे दोन दसरा मेळावे (dasara melava) बुधवारी पार पडले. यावेळी शिवाजी पार्कवरील (shivaji park) दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिंदूत्वाच्या मुद्यावरून भाजप (BJP) आणि शिंदे गटावर घणाघाती टीका केली. काँग्रेसबरोबर (Congress)आघाडी केली म्हणून आम्ही हिंदूत्व सोडले, अशी टीका भाजपकडून केली जाते. पण, शिवसेनेने (Shivsena) कधीही हिंदूत्व सोडलेले नाही, असा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावरुन आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे. मनसेकडून (MNS) या मेळाव्यावर टीका करण्यात आलीय. मनसे नेते संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी शिवतीर्थावर नळावरच्या भांडणासारखा दसरा मेळावा झाला असे म्हटले आहे. तसेच संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी केलेल्या एका दाव्याने खळबळ उडालीय. एकत्र निवडणूक लढवण्यासाठी आमच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी बोलणं केलं होतं, असा दावा संदीप देशपांडे यांनी केला आहे. 


"2017 मध्ये मला आणि संतोष धुरी यांना उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावले होते. महापालिका निवडणूक एकत्र लढवण्यासाठी आमच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी बोलणं केलं होतं. भाजपसोबत आम्ही लग्न मोडत आहोत त्यानंतर आपण लग्न करू असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. खंजीर खुपसण्याची यांची सवय जुनी आहे," असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला.


"बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचं काम फक्त राज ठाकरे करत आहेत. त्यावर राज ठाकरे यांनी तुरुंगवास भोगला आहे," असेही संदीप देशपांडे म्हणाले.


चाळीस आमदारांनी तुम्हाला आरसा दाखवला - संदीप देशपांडे


"गाई महागाई असा पांचट जोक उद्धव ठाकरेंनी केला. तुमच्या चाळीस आमदारांनी तुम्हाला आरसा दाखवला आहे तरी तुम्ही भांग पाडायला तयार नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणजे स्वतः उद्धव ठाकरे होणार असतील तर आम्ही कोपऱ्यापासून त्यांना नमस्कार करतो. आम्ही त्यांना अडीच वर्ष बघितलं आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्री असून अडीच तास मंत्रालयात बसले नाहीत. खोट्या शपथा घेतल्या तर देवबाप्पा शिक्षा करतो असा मी लहानपणी ऐकला आहे
याचा प्रत्येकाने विचार करावा," असे संदीप देशपांडे म्हणाले.