मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (CM Uddhav Thackeray)  आज आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2021) पंढरपूरला स्वतः गाडी चालवत विठ्ठलाच्या भेटीला गेले. यावर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री जसे स्वत: गाडी चालवत विठ्ठलाच्या भेटीला आले, तसेच ते स्वत: गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदेत असा टोमणा संदीप देशपांडे यांनी लगावला. देशपांडे यांनी ट्विट केलं आहे. (MNS Leader Sandeep Deshpande on Chief Minister Uddhav Thackeray on Mantralay attendance ) 



संदीप देशपांडे यांचं ट्विट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संदीप देशपांडे म्हणतात, ” हे बा विठ्ठला जसे आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच स्वतः गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदे. आणि जशी तुझी भेट घेतली तशी एकदा जनतेशी पण भेट घेउदे हीच तुझ्या चरणी प्रार्थना. पांडुरंग… पांडुरंग..”


मुख्यमंत्र्यांनी स्वतः केलं पंढरपूरपर्यंत ड्राईव्ह 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी काल दुपारी पंढरपूरला (Pandharpur) रवाना झाले. काल रात्री 9 च्या सुमारास ते पंढरपुरात दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह मुंबईतील मातोश्री निवासस्थानावरुन दुपारी अडीचच्या सुमारास पंढरपूरकडे रवाना झाले होते. यावेळी ते स्वत: ड्रायव्हिंग करत होते. या प्रवासाचा व्हिडीओ देखील समोर आला होता. 


 आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री क्षेत्र पंढरपुरात श्री विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा पार पडली. तुडुंब भरलेलं, आनंदी पंढरपूर पुन्हा पाहायचंय... ते वातावरण लवकर निर्माण होवो, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी यावेळी विठुराया चरणी केली आहे.