मुंबई : राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. वरळी पॅटर्नवरुन आमदार आदीत्य ठाकरे यांच्यावर मनसेने टीका केली होती. तर आता उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद टीकवण्यात जास्त रस असल्याची टीका सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभुमीवर संदीप देशपांडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत त्यातून सरकारच्या कामावर वाभाडे ओढले आहेत. लॉकडाउनमुळे जनतेचे हाल होतायत. डॉक्टर नर्सेना पीपीई किट्स उपलब्ध नाहीत. लोकांना अन्न धान्य मिळत नाही.


महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढतेय अस असल तरी मुख्यमंत्री विधानपरिषद निवडणुकीत व्यस्त आहेत स्वतःच मुख्यमंत्री पद राहण त्यांना महत्वाच आहे अशी टीका देशपांडे यांनी केली आहे.


तुमचे लॉकडाउनमुळे हाल होतायत, डॉक्टरांना, नर्सेसना पीपीई किट्स उपलब्ध नाहीत. जनतेला अन्न- धान्य मिळत नाहीए. कोणीतरी कुठेतरी अडकलाय. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढतेय. नागरिक बेरोजगार होताय. त्यांच्याकडचे पैसे संपतायत. रुग्णालयात जागा नाहीय. सरकारी तिजोरी खाली झाली आहे. कामावरून काढलं जातंय. शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. असे अनेक प्रश्न देशपांडे यांनी उपस्थित केले आहेत. पण सरकारला या सर्वाशी काही देणघेणं नसल्याचेही ते पुढे म्हणाले. 



मुख्यमंत्र्यांना केवळ विधान परिषद निवडणूक होणं महत्वाच वाटतयं. मुख्यमंत्रीपदी राहणं तर सर्वात महत्वाचं वाटतंय. त्यामुळे ते नेहमीच गोड बोलत राहतात असा खोचक टोला देशपांडे यांनी आपल्या पोस्टमधून लगावला आहे.