मुंबई : बाळासाहेबांचे फोटो लावून खंडणी घेतली जातेय, असा गंभीर आरोप मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केलाय. फेरीवाले बाळासाहेबांचे फोटो लावून खंडणी घेतात. भांडुपमधील स्थानिक आमदार सुनील राऊत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा फोटो लावून पैसे घेतले जातायत असा आरोप मनसेनं केलाय. बाळासाहेबांचे फोटो लावून हे कृत्य करणे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोज १० रुपये घेतले जातात आणि या फेरीवाल्यांना संरक्षण दिले जातेय. याचा कट मुख्यमंत्र्यां पर्यंत जातोय. पोलीस महानगरपालिका अधिकारी यांना आम्ही सांभाळू असे सांगत पैसे घेतले जातायत असे संदीप देशपांडे यांनी आरोपात म्हटलंय. 


सार्वजनिक पदपथांचा वापर करणाताना होणारा उपद्रव कमी करण्यासाठी आणि कचरा निर्मूलनासाठी घेण्यात येणारा कर असा उल्लेख शिवसेनेकडून देण्यात येणाऱ्या पावत्यांवर उल्लेख असल्याचे संदीप देशपांडे म्हणाले.



सरकारकडे हफ्ते पोहचत नसतील तर सरकार कारवाई करेल असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावलाय. आम्ही या सगळ्याची पोलिसात तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले. 


विरपन्नने जेवढं देशाला लुटलं नसेल तेवढ तेवढं मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी लुटलं आहे. यांचा एन्काऊंटर करावा लागेल. मुंबई खंडणीखोरांच्या ताब्यात आहे ती काढून घेतली पाहिजे असे ते म्हणाले.