मुंबई : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमधील दाराडो गावातील शिक्षिकेला जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या जळीतकांडात पीडिता ४० टक्के जळाली. तिचा सोमवारी दुर्दैवी मृत्यू झाला. संपूर्ण महाराष्ट्र तिच्या मृत्यूने हादरला असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पीडितेच्या मृत्यूनंतर आरोपील कठोर शिक्षा होण्याची मागणी करण्यात येत आहे. पीडितेच्या मृत्यूनंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेनंतर मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी उपरोधिकरित्या, अतिशय भावनिक पत्र लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंगणघाटमधल्या शिक्षिकेचा उपचारादरम्यान सोमवारी सकाळी ६.५५ च्या सुमारास मृत्यू झाला. ३ फेब्रुवारीला ही शिक्षिका कामवर जात असताना आरोपी विकेश नगराळेने भर रस्त्यात पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला होता. यात पीडिता ४० टक्के भाजली. पीडितेची अन्ननलिका, श्वासनलिकाच जळल्याने तिचा जीवनसंघर्ष सुरु होता. डॉक्टरांकडून सुरु असलेल्या सर्व उपचारांना अपयश येत, पीडितेने शेवटचा श्वास घेतला.


डॉक्टरांनी तिला फुलराणी असे नाव दिले होते. तर ही फुलराणीचे स्वप्न अपूरे राहिले आहेत. सुरवातीला ३ ते ४ दिवस तिने चांगला प्रतिसाद दिला. परंतू शुक्रवारपासून तिची प्रकृती खालावली. शिवाय रक्तदाबात चढ-उतार होत असल्यामुळे तिला श्वास घेण्यात देखील अडथळे येत होते. अखेर आज सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला. तोंडात सुज आल्यामुळे तिला बोलता देखील येत नव्हते. जळीतकांडाची घटना घडल्यानंतर राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे. पीडितेला जाळण्यात आल्यानंतर मोर्चा निघाले. आरोप झाले. मात्र यातून त्या मुलीचे प्राण कोणीच वाचवू शकलं नाही.