मुंबई : जेम्स लेन यांनी जे काही लिखाण केलं, त्या लिखाणाचा आधार बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखात होता. त्यात स्पष्ट उल्लेख आहे ही माहिती मी बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडून घेतली. लेखकाने गलिच्छ लिखाण लिहिलं, पण त्यावर खुलासे पुरंदरे यांनी केले नाहीत, असा आरोप शरद पवार यांनी काल केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार यांच्या या आरोपांचे मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केले आहे. बाबासाहेब यांनी जेम्स लेन यांच्या पुस्तकाला विरोध केला होता. यासंदर्भात पुरंदरे आणि अन्य इतिहासकार यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला लिहिलेले पत्र देशपांडे यांनी दाखविले.


मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सांगितले की, बाबासाहेब पुरंदरे आणि अन्य इतिहासकार या सगळ्यांनी मिळून १० नोव्हेंबर २००३ या दिवशी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला एक पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी जेम्स लेन यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचा विद्वेष जेम्स लेनच्या  डोक्यातून बाहेर आली.


जेम्स लेन यांचे लेखन हे घाणेरड्या मनोवृत्तीचा अविष्कार आहे. त्यांच्या लेखामुळे हजारो भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे जेम्स लेन यांचे हे पुस्तक प्रकाशित तसेच वितरित करण्यात येऊ नये. असे या पत्रात म्हटले आहे. तसेच, हे पुस्तक प्रकशित अथवा वितरित केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या पत्रातून देण्यात आला होता असेही देशपांडे यांनी सांगितले. 
  
या पत्रावर इतिहासकार जयसिंग पवार, निनाद बेडेकर, वसंत मोरे आदींच्या सह्या आहेत. हे पत्र हा ढळढळीत पुरावा आहे. बाबासाहेब यांनी लिहिलेले हे पत्र राष्ट्रवादीच्या नेत्यांना १०० टक्के माहित आहे. तरीही शरद पवार साहेब माझ्याकडे माहिती नाही, असे म्हणत आहेत.


मात्र, आता ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे हे पत्र त्यांच्याकडे पाठविणार आहोत. ते त्यांनी तपासावे आणि त्यावर आपले मत व्यक्त करावे. या पत्रामुळे त्यांचे समाधान झाल्यास त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणीही संदीप देशपांडे यांनी केली.