मुंबई : राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आज मनसेने महामोर्चाचं आयोजन केलं आहे. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांच्या विरोधात मनसेचा हा मोर्चा असणार आहे. यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. मनसेचा गड मानल्या जाणाऱ्या नाशिकमधून ही मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मुंबईत सकाळपासून दाखल होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वत: या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. त्यानंतर ते जाहीर सभा देखील घेणार आहेत. मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार असल्याने पोलिसांनी ही कडेकोट व्यवस्था ठेवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- मनसेच्या महामोर्चाला सुरुवात झाली आहे. राज ठाकरेंच्या नेतृत्वात या महामोर्चाला सुरुवात हिंदू जिमखाना येथून सुरुवात झाली आहे.


- मनसे अध्यक्ष राज ठाकरे थोड्याच वेळात हिंदू जिमखाना येखे पोहोचणार असून त्यानंतर मोर्चाला सुरुवात होणार आहे.



- मनसे अध्यक्ष राज ठाकरे हिंदू जिमखानासाठी रवाना


- राज ठाकरे सिद्धिविनायक मंदिरात दाखल झाले आहेत.


- अमित ठाकरे कृष्णकुंजवरुन बाहेर पडले आहेत.


राज ठाकरे मोर्चामध्ये सहभागी होण्याआधी सिद्धिविनायकांचं दर्शन घेणार


- थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कृष्णकुंज येथून मोर्चासाठी रवाना होणार आहेत.


- धुळे जिल्ह्यातील कार्यकर्ते गिरगाव चौपाटीवर जमले आहेत. त्यांनी 150 फुटी ध्वज सोबत आणला आहे.


- मोर्चाचा विषय हा देशाचा विषय आहे, आज भगवी लाट दिसणार - अमेय खोपकर


- शिवसेना नेतृत्वाचा आम्ही मान राखतो, त्यांनीही आमचा मान राखावा, परत काही बोलाल तर याद राखा -अमेय खोपकर


- ठाण्यात मनसे पदाधिकाऱ्यांकडून पाच पाखाडी येथे हनुमान मंदिरात आरती


- मनसेच्या मंचावर प्रबोधनकार ठाकरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले या महापुरुषांसह स्वातंत्र्यवीर सावरकर यांचाही फोटो लावण्यात आला आहे.



- राज ठाकरे यांना 'हिंदूजननायक' आणि 'आता सारे उठवू रान' असे मजकुराचे संदेश असणारे टी-शर्ट आणि भगवी टोपी घालून मनसे पदाधिकारी आझाद मैदानात दाखल


- दादरमध्ये राम मंदिरात मनसेची आरती


- मनसे नेते अमित ठाकरे घरातून बाहेर पडले


- मनसेचा मोर्चा भाजप पुरस्कृत असल्याची शिवसेनाची टीका


- महामोर्चासाठी मनसेचे नेते सज्ज, हजारो कार्यकर्ते मोर्चात सहभागी होणार