मुंबईत `मनसे` माणुसकीचं दर्शन, रुग्णवाहिकेला दिला रस्ता
एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीच्या निषेधार्थ मनसेतर्फे पश्चिम रेल्वे मुख्यालयावर संताप मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चादरम्यान मुंबईकरांच्या माणुसकीचं दर्शन घडलं.
मुंबई : एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीच्या निषेधार्थ मनसेतर्फे पश्चिम रेल्वे मुख्यालयावर संताप मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चादरम्यान मुंबईकरांच्या माणुसकीचं दर्शन घडलं.
(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
चेंगराचेंगरीच्या निषेधार्थ गुरुवारी पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे संताप मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात केवळ मनसे कार्यकर्तेच नाही तर सामान्य नागरिकही सहभागी झाले होते.
मोर्चेकरांनी शिस्तीचं दर्शन घडवत रुग्णवाहिकेला वाट करुन दिल्याचं पहायला मिळालं. या घटनेचा व्हिडिओ मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर अपलोड करण्यात आला आहे.
मुंबई शहर, उपनगर, ठाणे, वसई-विरार या परिसरातून नागरिक या संताप मोर्चात सहभागी झाले आहेत. मेट्रो सिनेमा ते चर्चगेट रेल्वे स्थानकापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात मुंबईकरांच्या माणुसकीचं दर्शन घडलं.