COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : मनसेनं सप्टेंबर २०२२ पर्यंत आपली नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत नेते पदावरून शिशिर शिंदे यांना तर सरचिटणीस पदावरून शिरीष पारकर यांना वगळण्यात आलंय. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतलाय. गेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या उमेदवार निवडीच्या प्रक्रियेतून डावलले गेल्याने शिशिर शिंदे पक्षात दुखावले गेले होते. त्यांनी त्यानंतर पक्षाच्या नेते पदाचा राजीनामा देऊन, काम करणं थांबवले होते. नुकत्याच झालेल्या राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सोहळ्याकडेही शिंदे यांनी यंदा पहिल्यांदाच पाठ फिरवली होती.


शिंदे उद्या शिवसेना वर्धापन दिनाचे औचित्य साधत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. शिरीष पारकर यांनीही वैयक्तिक कारण देऊन ५ वर्षांपूर्वीच मनसेचे काम करणं थांबवलं आहे. त्यामुळे यंदा नव्या कार्यकारिणीत शिंदे आणि पारकर यांचा विचार करण्यात आला नाही. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया मनसेनं राबवली आणि त्याचा तपशील आयोगाला सादर केलाय.


मनसेची नवी कार्यकारिणी