मुंबई : ‘पद्मावत’ सिनेमाला संरक्षण देऊ अशी घोषणा केल्यानंतर आता करणी सेना आक्रामक झाल्यावर मनसेने यातून माघार घेतली आहे. 


मनसेची कोलांटउडी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पद्मावत चित्रपटाबाबत मनसेकडून अद्याप कुठलीही अधिकृत भूमिका व्यक्त करण्यात आलेली नाहीये. सर्वोच्च न्यायालयानं हा चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यामुळे सरकारनं काय ते बघावं. मनसेचा याप्रकरणाशी काहीही संबंध नाही, अशी माहिती पक्षाचे नेते आणि प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी दिली.


करणी सेनेची धमकी


महाराष्ट्र करणी सेनेचे अध्यक्ष अजय सिंह सेंगर यांनी राज ठाकरे यांना काळं फासू असा इशारा दिला होता. त्यानंतर मनसेकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. 


शालिनी ठाकरे यांची आधीची भूमिका


त्याआधी मनसेच्या सरचिटणीस व महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा (working president) शालिनी ठाकरे यांनीच याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले होते. मनसेने 'पद्मावत'ला संरक्षणही देऊ. यापूर्वी आम्हीही अनेक चित्रपटांना विरोध केला. मात्र, हा विरोध मुद्द्यांवर होता. चित्रपटाच्या आशयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आम्ही एकाही चित्रपटाला विरोध केला नाही, असे ठणकावून सांगतानाच 'पद्मावत'ला होत असलेल्या विरोधाला मनसेने ठाम विरोध केला होता.


विरोधासाठी भारत बंदची हाक चुकीची


'पद्मावत'ला सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिली आहे. सुप्रीम कोर्टानेही 'पद्मावत'ला परवानगीरूपी दिलासा दिलेला आहे. असे असताना चित्रपटाला विरोध करण चुक आहे. तसेच, चित्रपटाला विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक देणं हे तर, त्याहून चूक असल्याचे शालिनी ठाकरे यांनी म्हटले होते.