मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी कंबर कसलेली दिसत आहे. मनसेनेने आणखी एक कायदेशीर खेळी केली. मनसेतून फुटून शिवसेनेत गेलेल्या ६ नगरसेवकांना आणि मनसेत राहिलेल्या एका नगरसेवकाला पक्षाकडून व्हीप जारी करण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांच्याकडून पुढील सूचना येईपर्यंत महापालिका सभागृहात तसेच समिती बैठकांमध्ये मतदान करु नये, असा व्हीप बजवण्यात आला आहे. व्हीपचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.


सहा नगरसेवक जरी शिवसेनेत गेले असले तरी तांत्रिकदृष्टी ते मनसेत आहेत. तसा दावा मनसेनेने केलाय. फुटून शिवसेनेत गेलेले नगरसेवक तांत्रिकदृष्ट्या अजून आमचेच, असे सांगत मनसेनेने त्यांना हा व्हीप बजवलाय आणि हा व्हीप बजावण्याचा अधिकार असल्याचे मनसेकडून सांगण्यात आलेय.


मनसे नगरसेवकांचा पालिका समिती तपशील


- दिलीप लांडे : स्थायी  समिती आणि विधी समिती, सदस्य 


- परमेश्वर कदम : सुधार समिती,सदस्य


- संजय तुर्डे : बाजार आणि उद्यान समिती, स्थापत्य समिती उपनगर, सदस्य


- दत्ता नरवणकर : बेस्ट समिती आणि स्थापत्य समिती शहर, सदस्य


- हर्षला मोरे : महिला व बालकल्याण समिती, सदस्य


- अश्विनी माटेकर : शिक्षण समिती, सदस्य


- डॉ. अर्चना भालेराव : आरोग्य समिती सदस्य