COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : राज्यातील प्लास्टिक बंदीचा मनसेनं मातोश्रीबाहेर पोस्टरबाजी करत उपरोधिक विरोध केलाय. प्लास्टिक बंदीनंतर ज्या व्यक्तीकडे प्लास्टिक आढळेल त्याच्याकडून पाच ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात येणार आहे. याच दंडाच्या कारवाईची खिल्ली उडवणारं पोस्टर मनसेनं मातोश्री आणि मुंबईतील विविध भागात झळकावलंय. दंड वसूलीऐवजी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना वॉटरप्रूफ कापडी पिशवी द्यावी अशा आशयाचं हे पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरलंय.


मनसेचं आव्हान 


या पोस्टरच्या माध्यमातून मनसेनं पर्यावरण मंत्री, महापौर, पालिका आयुक्त आणि नगरसेवकांना प्लास्टिकला पर्याय उपलब्ध करुन देण्याचं आव्हान दिलंय.