मुंबई : MNS prepares for municipal elections : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्याची तयारीही सुरु केली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून लोकसभा निहाय पक्षीय कमिटी जाहीर करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. त्याचवेळी ते म्हणाले, मनसे किंग मेकर नव्हे किंग असेल. (MNS prepares for municipal elections, Lok Sabha wise committees appointed - Bala Nandgaonkar)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवून मनसेनेने नव्याने पक्षाची कमिटी तयार केली आहे. आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून लोकसभा निहाय पक्षीय कमिटी जाहीर करण्यात आल्या आहेत. या कमिट्या आढावा घेऊन पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अहवाल देतील. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक इथे लोकसभा निहाय या कमिटी असतील, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.


मुंबई, पुणे, नाशिक आणि ठाणे येथे मनसेचे विशेष लक्ष असणार आहे. त्यादृष्टीने बांधणी करण्यात येणार आहे. महापालिका निवडणुकीत मनसे किंग मेकर नव्हे तर किंग असेल, असा दावा बाळा नांदगावकर यांनी केला आहे.


तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः लक्ष घालणार आहेत. या ठिकाणी मनसे पदाधिकारी कमिटी देण्यात आलेली नाही. तर मनसे नेते अमित ठाकरे ईशान्य मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे आणि नाशिक या ठिकाणी लक्ष देणार आहेत.


या कमिटीत मनसे नेते, सरचिटणीस, उपाध्यक्ष असतील. या कमिटी निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांची चाचपणी करतील.मतदार संघाचा आढावा घेतील. या सगळ्याचा अहवाल काही दिवसात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे दिला जाईल, असे ते म्हणाले.


दरम्यान, कर्नाटकमधील हिजाब प्रकरणावर मनसेने सावध प्रतिक्रिया दिली आहे. हिजाब आणि भगवा या बद्दल पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे बोलतील, असे नांदगावकर म्हणाले. आमची भूमिका हिंदुत्ववादी असली तरीपण असे होणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.