मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली काल मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. जवळपास पन्नास पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या दादर इथल्या शिवतीर्थ इथं या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, शालिनी ठाकरे हे नेते बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर राज ठाकरे पुण्याला रवाना झाले


राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार सदस्य नोंदणी
मनसेची सदस्य नोंदणी आजपासून सुरू केली जाणार आहे. याबाबत या बैठकीच आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या वर्षी मुंबईतून सदस्य नोंदणीला सुरुवात झाली होती. यंदा पुण्यातून सदस्य नोंदणीला सुरुवात होणार आहे. आजपासून पुण्यामध्ये मनसे सदस्य नोंदणीला सुरुवात होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये सदस्य नोंदणीला सुरुवात होईल. 


दरम्यान शस्त्रक्रिया झाल्यानंतर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत भाषणाद्वारे कार्यकर्त्यांन संबोधित केलं होतं. मुंबई महानगरपालिकेसह इतरही महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या तोंडावर या सदस्य नोंदणीला महत्व आहे.