मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजिव अमित ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह
सेलिब्रेटी, राजकाणी ते सर्वसामान्य जनता सर्वांनाचा कोरोना संसर्गाने विळखा घातला आहे
मुंबई : राज्यातील कोरोना संसर्ग बेफाम गतीने वाढत आहे. सेलिब्रेटी, राजकाणी ते सर्वसामान्य जनता सर्वांनाचा कोरोना संसर्गाने विळखा घातला आहे. महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
अमित ठाकरे यांनी काही दिवसांपासून कोरोनाची लक्षणं जाणवत होती. त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अमित यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घरातील इतर सदस्यांना संसर्ग होऊ नये म्हणून त्यांनी ही खबरदारी घेतली आहे.