मुंबई :  MNS Raid : वसईत एका अनधिकृत गाळ्यात सुरू असलेला तेलाचा काळा धंदा मनसेने उघड केला. नालासोपारा (Nalasopara) फाटा परिसरात उमर कंपाउंड इथे एका गाळ्यात नागरिकांच्या आरोग्याला घातक असलेल्या सन फ्लॉवर तेलाचं पॅकिंग केले जात होतं. मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह धाड टाकून याचा भांडफोड केला. या तेलाचा वसई-विरार सह पालघर परिसरात वेफर्स फरसाण बनवण्यासाठी वापर होत होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बनावट खाद्यपदार्थ, भेसळयुक्त पदार्थ अथवा अन्य इतर कोणत्याही बाबींवर FSSAI ची बारीक नजर असते. मात्र, तरीदेखील असे प्रकार सुरुच असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. भेसळ करणारे व्यावसायिक आज राजरोस दिसून येत आहेत. असाच एक प्रकार मनसेने नालासोपाऱ्यामध्ये उघड केला आहे. खाद्यतेलामध्ये भेसळ केली जात असल्याचे या ठिकाणी दिसून आले. या गोदामामध्ये मनसे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी संध्याकाळी धाड टाकली. यावेळी गोदाम मालकाला मनसे स्टाईलने धडा दिला. याचा व्हिडीओ अविनाश जाधव यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे.



नालासोपारा फाट्यावर गाळ्यांमध्ये अनधिकृतपणे खाद्यतेलांमध्ये भेसळ केली जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. हे खाद्यतेल वसई-विरार परिसरामध्ये वेफर्स, फरसाण बनवणाऱ्या व्यावसायिकांना विकले जात होते. त्यामुळे आपण खात असलेल्या वेफर्स-फरसाणसाठी भेसळयुक्त तेल वापरले जात असल्याची शक्यता अविनाश जाधव यांनी व्यक्त केली आहे.