मुंबई : कोरोनाने मुंबईतील अनेक भागात आपलं जाळं पसरलं आहे. अगदी सुरूवातीपासून मुंबईतील 'वरळी' परिसर हा कोरोनाचा हॉट स्पॉर्ट बनला आहे. वरळी, प्रभादेवी, लोअर परेस परिसरात एकूण कोरोनाचे ६०० रूग्ण आढळले आहेत. यामुळे चिंता वाढली आहे. वरळीत वेगवेगळे पॅटर्न लागू केले जात आहेत. असं असताना आता या मुद्यावरून राजकारण सुरू झालं आहे. मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्य ठाकरेंचा 'वरळी पॅटर्न' म्हणण्याला अर्थ नाही.वरळीतल्या जिजामाता नगर,मारिअम्मा नगर इथे कोरोना रुग्ण वाढत आहेत.वरळीतल्या या भागांना वरळी पॅटर्न लागू होत नाही का? स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे यांनी मतदार संघाला किती वेळा भेटी दिल्या ? असा सवाल मनसेकडून विचारण्यात आला आहे .करोनाविरोधातील लढाईची वस्तुस्थिती अशी असतानाही “आदित्य ठाकरेंचा वरळी पॅटर्न देशभरात लागू होणार” असा प्रचार सत्ताधारी शिवसेनेच्या वर्तुळातून केला जातोय. पण वरळीतली सत्य परिस्थिती वेगळी आहे आदित्य ठाकरे यांचा वरळी पॅटर्न म्हणणाऱ्यांनी उत्तर द्यावी


परवा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय पत्रकार परिषदेत संयुक्त सचिव लव अग्रवाल यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की, भिलवाडा पॅटर्न जर यशस्वी ठरला आहे तर तोच पॅटर्न सर्वत्र लागू का केला जात नाही? या प्रश्नावर लव अग्रवाल यांनी जे उत्तर दिलं ते अत्यंत महत्वाचं आहे. लव अग्रवाल स्पष्टपणे म्हणाले की, “करोनाला रोखण्यासाठी असा कोणताही ‘पॅटर्न’ नाही. प्रत्येक ठिकाणच्या परिस्थितीनुसार तिथली स्ट्रॅटेजी आखली जाते.”


कपाळावर मुकुट, खालसून नागडो! परवा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय पत्रकार परिषदेत संयुक्त सचिव लव अग्रवाल यांना...

Posted by Kirtikumar Shinde MNS on Friday, May 1, 2020

करोनाविरोधातील लढाईची वस्तुस्थिती अशी असतानाही “आदित्य ठाकरेंचा वरळी पॅटर्न देशभरात लागू होणार” असा प्रचार सत्ताधारी शिवसेनेच्या वर्तुळातून केला जातोय. पण वरळीतली सत्य परिस्थिती काय आहे? वरळीचा परिसर ज्यांच्या कार्यकक्षेत येतो ते पालिकेचे सहायक आयुक्त शरद उघडे हे गेला महिना-दीड महिना स्वत:च्या घरी गेलेले नाहीत. तिथले वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिवाकर शेळके यांनी कायदा- सुव्यवस्था कठोरपणे राखली. वैद्यकीय अधिकारी श्री. गोल्लर यांनी त्वरित वैद्यकीय उपाययोजना राबविल्या.


या सर्वांनी आणि त्यांच्या सहका-यांनी अथक परिश्रम घेऊन करोनाचा संसर्ग आटोक्यात आणला, त्याबद्दल ते निश्चितच कौतुकास पात्र आहेत. विशेष म्हणजे, केंद्र सरकारच्या ज्या पाहणी पथकाने वरळीच्या एनएससीआय स्टेडियममधील ५०० खाटांच्या ‘कोविड केअर सेन्टर अलगीकरण केंद्र’ येथे भेट दिली, त्यांनी या केंद्राचे कौतुक केल्याची माहिती उघडे यांनीच दिली आहे. केंद्र सरकारच्या पाहणी पथकाने पालिका अधिका-यांनी राबवलेल्या या उपाययोजनांचे कौतुक केले, हे खरे, पण पाहणी पथकाने ‘वरळी पॅटर्न’ हा शब्द खरोखरच वापरला का? असा प्रश्न उभा राहत आहे.