मुंबई : मनसेच्या मोर्चासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. कधीकाळी मनसेचा गड किल्ला असलेले नाशिक पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या नेतृत्वात निघणाऱ्या पक्षाच्या मोर्चासाठी रवाना झाले आहेत. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून कार्यकर्ते नाशिकला येऊन मग मुंबईकडे रवाना झाले. यामध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या देखील लक्षणीय आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील मनसेच्या मोर्चासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते दाखल होण्याची शक्यता आहे. नाशिकमधूनही मनसे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. नाशिकच्या घोटीमधून ग्रामीण भागातले कार्यकर्ते रवाना झाले. 


उत्तर महाराष्ट्रातून मनसेचे कार्यकर्ते मुंबईकडे जोमानं निघाले आहेत. सकाळी निघताना पाय भाजल्यानं गंभीर जखमी अवस्थेत असलेला रमेश कारले तशाच अवस्थेत मुंबईकडे रवाना झाले आहेत.


मनसेकडून मुंबईत आज भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. मोर्चाचं नियोजन करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून मनसे नेत्यांची तयारी सुरु होती.


पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांची हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी मुंबईत मनसे भव्य मोर्चा काढत आहे. हा मोर्चा गिरगावपासून आझाद मैदानापर्यंत काढण्यात येणार आहे.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि कार्यकर्ते मरिन लाइन्स इथल्या हिंदू जिमखाना इथून आझाद मैदानात जाणार आहे. त्यानंतर आझाद मैदानात राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे पदयात्रा, सभा यावर सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे.