मुंबई : मुंबईत 29 सप्टेंबरला एल्फिस्टन स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कामाकडे बोट दाखवत मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवाशांना चालण्यासाठी स्टेशन परिसरातील भाग मोकळा असावा या पार्श्वभूमीवर मनसेने मुंबईतील फेरीवाल्यांविरोधात खळ्ळ खट्याक सुरू केले आहे. 


फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसने मोर्च्याचे आयोजन केले आहे. पण या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड करायला सुरुवात केली आहे. आजच्या मोर्चाच्या वेळी अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली जात आहे.


दरम्यान आजच्या काँग्रेसच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी देऊ नये, अन्यथा काही अनुचित घटना घडल्यास मनसे जबाबदार राहणार नाही, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला होता.