मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर रविवारी विक्रोळी परिसरात मराठी पाट्यांच्या मुद्यावर हल्ला झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचे पडसाद आता सर्वत्र उमटत आहेत. पनवेलमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी मराठी पाट्या लावण्याचा मुद्दा उचलून धरला. विक्रोळीमध्ये मराठी पाट्या लावा हे पत्रक वाटायला गेलेल्या मनसे कार्यकर्त्यांना जबर मारहाण केल्यानंतर आता त्याचे पडसाद सर्व राज्यात उमटताना दिसत आहे. 



मराठी पाट्यांचा मुद्दा 



आता कल्याणच्या ८२ व्यावसायिकांवर न्यायालयाने फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. आता बऱ्याच दुकानदारांनी पुन्हा कायदा मोडला असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यावर येत्या १५ दिवसांत कडक कारवाई करण्याचे देखील न्यायालयाने संदेश दिले आहेत. 'महाराष्ट्र राज्य दुकाने व आस्थापना कायदा १९६१ - २० ए' अन्वये महाराष्ट्रात आस्थापनांवरच्या पाट्या मराठीतच असायला हव्यात. या कायद्याची अंमलबजावणी व्हायलाच हवी अन्यथा मनसे आपल्या स्टाईलने आक्रमक होणार असा इशारा देखील मनसेने दिला आहे. 



मनसे कार्यकर्त्यांनी मराठी पाट्यांच्या मुद्यावरून आक्रमकता दाखवल्यावर त्यांना गुंड असं संबोधण्यात आलं. या मुद्यावर मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या की गुंडांना आमचे कार्यकर्ते गुंडच वाटणार, आमचं काम सुरूच राहणार असं त्यांनी सांगितलं.