धर्मांतरासाठी पतीकडून दबाव; मॉडेलची तक्रार
धर्मांतरास नकार दिल्याने मुलाचं अपहरण करण्यात आले, अशी तक्रार पीडित मॉडेलने मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात केली आहे.
मुंबई : धर्मांतर करण्यासाठी पतीकडून दबाव टाकण्यात येतोय आणि बेदम मारहाण करण्यात आली असा आरोप मुंबईतील एका मॉडेलने केला आहे. धर्मांतरास नकार दिल्याने मुलाचं अपहरण करण्यात आले, अशी तक्रार पीडित मॉडेलने मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात केली आहे.
तेरा वर्षापूर्वी मुस्लिम तरूणाशी विवाह
तेरा वर्षांपूर्वी या मॉडेलचा विवाह एका मुस्लिम तरुणाशी झाला होता. त्यावेळी लग्नानंतर धर्मांतराची गरज नसल्याचे पतीने सांगितल्याचा दावा या मॉडेलने केला आहे. मात्र आता पती धर्मांतरासाठी दबाव टाकत असून मारहाण करत असल्याचा आरोप या मॉडेलने केला आहे.
धर्मांतरास नकार, पतीने दुसरं लग्न केलं
धर्मांतरास नकार दिल्याने पतीने दुसरं लग्न केलं आणि दुसऱ्या पत्नीलाही धर्मांतरास त्याने भाग पाडलं असा आरोपही या महिलेनं केलाय. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा लव जिहादशी संबंध आहे का याचा तपास करण्यात येतोय.