मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ठाणे आणि दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण करण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उपनगरातील रेल्वे प्रवासी ज्याची वाट पाहत होते. त्याची सुरुवात अखेर झाली आहे. यामुळे चाकरमान्यांचा त्रास आणखी कमी होणार असून रेल्वेच्या फेऱ्या देखील वाढल्या आहेत. (Pm Modi on inaugurating 2 rail lines of Thane & Diva)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदींनी यावेळी बोलतांना म्हटले की, 'उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. मुंबईची कधी न थांबणारी लाईफ लाईनला आता अजून वेग मिळणार आहे. यातून 4 फायदे मोठ्या प्रमाणात होणार आहे. यात लोकलला वेगळा मार्ग असेल आणि लांब पल्याच्या गाडयांना वेगळा मार्ग असेल. कोणत्याही कारणाने मेल गाडी थांबणार नाही आणि 4थे म्हणजे रविवारची काम कमी होतील.'



'36 रेल्वे गाड्या वाढवण्यात येणार आहे. गेल्या 7वर्षात मेट्रोचा देखील प्रसार झाला आहे. मुंबई लोकलच्या आधुनिकीकरणाचे काम हे हातात घेतले जाणार आहे. 2007-08 ला या कामाला सुरवात झाली पण कामाला वेग 2015 नंतर प्राप्त झालं. त्या नंतर हे काम पूर्ण झाले आहे. नवीन कामे देखील करण्यात आली असून महत्वाची 14 नवीन रेल्वे स्टेशन व त्यांच्या कामाचा समावेश आहे.'


मुंबईच्या विकासावर आमचे प्रामुख्याने लक्ष आहे. मुंबई लोकलची रेल्वे सेवा देखील येत्या काळात सुधारणार आहे तर 19 स्थानकांचे नूतनीकरण करणार आहे. या सुधारणामुळे मुंबई आणि मुंबई नजीकच्या सर्व गरीब नागरिकांना याचा फायदा होणार आहे.'


'मुंबईमध्ये नाही तर मुंबईला अन्य राज्यांशी जोडण्याचे काम देखील करण्यात येणार आहे. यात मुंबई-अहमदाबाद रेल्वे देखील मोठ्या गतीने होणार आहे. '


'कोरोना काळात किसान रेल्वेच्या माध्यमातून देशातील शेतकरण्याना जोडले आहे. तर रेल्वे सुविधा वाढवल्याने लॉजिस्टिक मध्ये देखील मोठा बदल होणार आहे. मुंबईच नवे तर मुंबईच्या बाहेरील सर्व राज्यातील रेल्वे सुविधांचा वापर आणि त्याची सेवा यात सुधारणा सुरु आहे.'


'भारतात वंदे भारत सारख्या आधुनिक ट्रेन ह्या आपल्याकडे बनवल्या जातात तर बाहेरगावच्या रेल्वे सुद्धा इथे बनवले जातात.'