नवी दिल्ली: मोदी सरकारचा बहुचर्चित शपथविधी सोहळा गुरुवारी दिल्लीत पार पडल्यानंतर शुक्रवारी मंत्र्यांची खातेनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात आली. मोदींच्या मंत्रिमंळात एकूण ५७ मंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये २४ कॅबिनेट मंत्री, ९ स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री आणि २४ राज्यमंत्री आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मात्र, खातेवाटप जाहीर न झाल्यामुळे कोणत्या मंत्र्यांना बढती मिळणार त्यातही अतिमहत्त्वाच्या संरक्षण, अर्थ, गृह आणि परराष्ट्र खात्याची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर सोपवली जाईल याची उत्सुकता कायम होती. अखेर आज ही उत्सुकता संपुष्टात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, या सगळ्यात महाराष्ट्रातील सात मंत्र्यांच्या वाट्याला कोणते खाते येणार याचीही उत्सुकता राज्यातील नागरिकांना लागली होती. हे चित्रदेखील आता स्पष्ट झाले आहे.


खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आज संध्याकाळी पाच वाजता नवनिर्वाचित मंत्र्यांची मोदींसोबत बैठक होणार आहे. यानंतर हे सर्व मंत्री आपापल्या खात्याचा पदभार स्वीकारतील.


मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर, जाणून घ्या कोणाला कोणतं खातं



* नितीन गडकरी – रस्ते वाहतूक मंत्री, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री


* अरविंद सावंत – अवजड उद्योग मंत्री


* पीयुष गोयल – रेल्वे मंत्री, वाणिज्य मंत्री


* प्रकाश जावडेकर – पर्यावरण मंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यमंत्री


* रामदास आठवले – सामाजिक न्याय राज्यमंत्री


* संजय धोत्रे – मनुष्यबळ विकास राज्यमंत्री, दूरसंचार राज्यमंत्री, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री


* रावसाहेब दानवे – अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री, ग्राहक मंत्रालयाचे राज्यमंत्री