मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्याची देशातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.  पाटील म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त 2 तास झोपतात. ते एक प्रयोग करीत आहेत. ज्यामुळे त्यांना झोपच येणार नाही. देशासाठी 24 तास काम करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यांची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. देशासाठी पंतप्रधान 24 तास जागी राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. यावर सोशल मीडियामध्येही चर्चा रंगली आहे. 


कोल्हापूरातील उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकांच्या निमित्ताने कार्यकर्त्यांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हटले की, पंतप्रधान मोदी 22 तास काम करतात. आता ते आपल्याला झोपच येऊ नये यासाठी प्रयत्न करीत आहेत. देशासाठी पंतप्रधान प्रत्येक मिनिटाला काम करीत असतात. असा दावा पाटील यांनी केला आहे.