मुंबई : Money Laundering Case : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख आणि सलील देशमुख यांना 5 एप्रिलला न्यायालयासमोर हजर राहण्याचे समन्स पाठविण्यात आले आहे. विशेष पीएमएलए न्यायालयाने हे समन्स जारी केले आहेत.(Money Laundering Case- Court summons Anil Deshmukh's Son)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांची वसुलचा आरोप माजी मुंबई पोलीस आयुक्त परबीरसिंह यांनी केला आहे. तसेच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपी असलेल्यांची यादी बनविण्यात आली आहे. त्यात अनिल देशमुख हे आरोपी क्रमांक 15 आहेत.


अनिल देशमुख यांच्या जामिनावर आज विशेष पीएमएलए न्यायालयात सुनावणी झाली. त्यावर ईडीने न्यायालयात उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी  9 फेब्रुवारी रोजी होणार आहे. ईडी न्यायालयासमोर 9 फेब्रुवारी रोजी उत्तर दाखल करणार याच दिवशी सुनावणी होण्याची शक्यता आहे.