मोबाईल दुकानातील गल्ला चोरट्याने केला साफ
मुंबई : मुंबईतील मनिष मार्केटमधील एका मोबाईल दुकानातील गल्ल्यावर चोरट्याने हात साफ केला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. हा चोरटा ग्राहक म्हणून दुकानात आला होता. दुकानात कुणी नसल्याचा फायदा यावेळी चोरट्याने घेतला आणि पैसे घेऊन पसार झाला. आता पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्याचा शोध घेतायेत.